अमूर्त चित्र.. a thought

[responsivevoice voice=”UK English Female” buttontext=”Listen to this”]

अमूर्त चित्र.. a thought

जसे नृत्य …गायनाला शास्त्र आहे ..गीत व कवितेलाही .. तसेच चित्रकलेला ठराविक शास्त्र आहे.
चित्र त्या नियमांना धरूनच पुर्ण केलं जातं.
चित्रकाराला व चित्र पाहणार्याला त्या शास्त्राद्वारे जो आनंद मिळतो ..तेवढच त्या चित्राचे कार्य आहे….त्यात प्रयेकाला गूढ काहीतरी सापडावं असं काहीच नसतं.
पण तरी तो आनंद कितीही सोप्पा वाटला तितकाच अवघड… प्रत्येक चित्रकाराची त्याच्या आवडी व अभ्यास ..सरावाप्रमाणे एक विशिष्ठ शैली असते… आणि त्याच सहाय्याने तो ते ठराविक भाव सहज आपल्या चित्रात उतरवतो.

कोणतिही कला असो …ते शास्त्र ..नियम प्रात्यक्षिक आणि वैचारिक दोन्ही असतात ..काही ठराविक वय गाठल्यानंतरच पदरी पडतात.
तोपर्यंत त्या कलाकाराने कटपुथली प्रमाणे स्वतःला आपले शिक्षिक सांगतिल त्याप्रमाणे अभ्यासात झोकून द्यायचे.
जसे बाथरूम सिंगर त्या परिपुर्ण अभ्यासाशिवाय गायक होत नाहीत ..Abstract अमुर्त गाचकाचा टॕग लावून फिरत नाहीत.
जासे मिरवणूक किंवा पब मधे नाचणारे ..Abstract अमुर्त डान्सर्स चा टॕग लावून फिरत नाहीत …

चित्रामधेतरी अमुर्त इतक्या सहज कसंकाय शक्य होइल?
लहान मुलांचा कॕनव्हासवर मांडलेला रंगांचा खेळ कितीही सुंदर वाटला तरी तो खेळच असतो…
त्याला अमुर्त चित्र हे नाव देऊन पळवाट काढता येत नाही …हे कित्येक चित्रकारांनाच कळत नाही… आणि त्या लहानग्यांच्या त्या चित्रनामक खेळांची प्रदर्शनंही भरवतात.

मुर्त चा अभ्यास केल्यानंतरच अमुर्त ….
First Learn The Reality ..then Express as an Abstract
……….bhavna.2018.[/responsivevoice]

Leave a Reply